खारेपाटण केंद्र शाळेत कृषी
दिनानिमित्त वृक्ष लागवड

⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शालेत महाराष्ट्र् कृषी दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षकांनी शाळेच्या आवारात नारळाच्या रोपांची वृक्ष लागवड केली.
यावेळी खारेपाटण केंद्र शाळेचे उच्चश्रेणी मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर सर,शाळेच्या जेष्ठ शिक्षिका श्रीमती स्मिता कोरगावकर तसेच शिक्षक वृंद व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
कृषी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना कृषी दिनाचे महत्व याविषयावर शिक्षकांनी मार्गदर्शन केले.तर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी स्वतः मातीमध्ये खड्डे खणून त्यामध्ये वृक्ष लावण्याचे प्रात्यक्षिक अनुभव घेतले.

You cannot copy content of this page