सत्कर्म फाउंडेशनतर्फे शेर्पे,बेर्ले कुरंगावणे येथील १७५ विदयार्थ्यांना मोफत वह्या वाटप

⚡कणकवली ता.०२-:
बेर्ले गावाचे सुपुत्र व डोंबिवलीचे पत्रकार विजय राऊत यांच्यावतीने सन – २००९ पासून जि.प. शाळा , बेर्ले या शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळा सुरू होताच मोफत वह्या वाटप व शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहेत .गेली दोन वर्षे कोरोना मुळे यात व्यत्यय आला होता.तसेचआता बेर्ले शाळेची पटसंख्या कमी झाली .मात्र तरीही त्यांनी हा स्तुत्य उपक्रम बंद न करता त्याचा विस्तार करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला असून मोफत वह्या वाटप हे दरवर्षी करीत राहनार आहे.

यावर्षी विजय राऊत अध्यक्ष असलेल्या सत्कर्म फाउंडेशन व खारेपाटण येथील समाजसेवक रुपेश सावंत यांच्या सहकार्याने नुकत्याच जि.प. शाळा बेर्ले, जि. प. शाळा शेर्पे, जि. प. शाळा कुरंगवणे व माध्यमिक शाळा शेर्पे या शाळांमध्ये जावून सुमारे १७५ गरीब व गरजू अशा सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.
विजय राऊत व रुपेश सावंत हे शहरात नोकरी व्यवसाय करून आपल्या समाजाची सेवा करीत असल्याने त्यांचे कौतुक करावे ते थोडेच असेल , त्यांच्या कार्यातून अन्य चाकरमानी मंडळींनी गावाच्या विकाकासासाठी पुढाकार घेतल्यास प्रत्येक गावाचा विकास होईल ,असे प्रतिपादन सतीश सावंत यांनी केले .
विजय राऊत हे खारेपाटण येथील शेठ न . म.विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचा आनंद व अभिमान वाटतो ,असे वक्तव्य महेश कोळसुळकर यांनी केले.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे कणकवली विधानसभा संघटक सचिन सावंत ,मधुकर वळंजू,महेश कोळसुळकर , सुकांत वरुणकर , शेर्पे गावाच्या सरपंच निशा गुरव ,रुपेश सावंत ,विजय राउत ,रामचंद्र राऊत,संजय राऊत , विजयशेठ म्हात्रे ,मदन म्हात्रे, शरद म्हात्रे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page