पावशी ढवणवाडी शाळेतील मुलांची दंतचिकित्सा

कुडाळ इनरव्हील क्लबचा सामाजिक उपक्रम

ओरोस ता २
1 जुलै डॉक्टर्स डे निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पावशी ढवणवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांची व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना दाताची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कुडाळ येथील इनरव्हील क्लब या सेवाभावी संस्थेकडून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. इनर व्हील क्लब कुडाळच्या अध्यक्षा श्रीम. कुडाळकर व इनरव्हील क्लब सदस्यांचे शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रेया पेडणेकर व उपाध्यक्षा विशाखा ढवण यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
           सर्वप्रथम कुडाळ येथील प्रसिद्ध डॉक्टर शितल देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करून प्रत्येक मुलांच्या पालकांना माहिती दिली. त्यानंतर लहान मुलाच्या दातांची निगा कशी राखावी व कोणती काळजी घ्यावी याविषयी पालकांना प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन केले. पालकांच्या शंकांचे समाधान केले. यानंतर इनरव्हील क्लब कुडाळच्या अध्यक्षा श्रीम. कुडाळकर यांनी आपल्या क्लब मार्फत राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चांगले दात असणाऱ्या मुलांचे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. याबरोबरच सर्व मुलांना नियमित दात घासण्याची सवय लागावी यासाठी ब्रश व पेस्टचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉक्टर्स डेचे औचित्य साधून उपस्थित सर्व डॉक्टर्सना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच कृषी दिनानिमित्त उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थी यांच्या हस्ते शाळेच्या आवारात फुल व फळ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
            यावेळी उपस्थित कुडाळ इनरव्हील क्लब डॉ. श्रीमती प्रभू, डॉ. श्रीमती देसाई, डॉ. श्रीमती तेली, श्रीम. बोभाटे यासह इतर मान्यवर इनरव्हील सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अंगणवाडी सेविका सुचित्रा भोगटे, मदतनीस मिनाक्षी कुबडे, स्वयंपाकी मनिषा कुंभार, मदतनीस रंजना गोसावी, पालक,  ग्रामस्थ व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी कर्पे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपशिक्षक चंद्रकांत कदम यांनी केले.

फोटो ओळ:- पावशी: पावशी ढवणवाडी शाळेतील विद्यार्थ्यासोबत कुडाळ इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा श्रीमती कुडाळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रेया पेडणेकर व अन्य

You cannot copy content of this page