ब्रिगेडयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 10 हजार झाडे लावण्याच्या मोहीमेचा शुभारंभ

⚡कणकवली ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 10 हजार झाडे लावण्याची मोहीमेचा शुभारंभ संस्थेचे उपाध्यक्ष तथा किर्लोस गावचे सरपंच प्रदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली 1 जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील 11 गावांमध्ये 5 हायस्कूल,आडवली, रामगड,शिरवंडे,हिवाळे,असरोंडी व प्राथमिक शाळा , आडवली,श्रावण,रामगड 1 नंबर,रामगड बेळणे 2 नंबर,गोठणे कोंडवाडी, किर्लोस शाळा नंबर 1,आंबवणे शाळा नंबर 2, भावेवाडी शाळा नं. 3 ,शिरवंडे बांबनियेवाडी,ओवळीये कोलेरी शाळा, हिवाळे 1 नंबर शाळा असगणी एक नंबर
शाळा,आडवली ग्रामपंचायत ऑफिस असगणी, राठीवडे ग्रामपंचायत ऑफिस,बेळणे चेकपोस्ट, रामगड बाजारपेठ इत्यादी ठिकाणी लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.

यामध्ये शिक्षक मुले यांचा उस्फुर्त सहभाग मिळाला. यामध्ये अरुण लाड, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष परब,रामगडचे नरेश कामतेकर, शामराव देसाई,तारकर,पारकर, रामगडचे उपसरपंच अमित फोंडके , गोठणे सरपंच श्रेया चव्हाण, कृषी कॉलेजचे विद्यार्थी, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी गावडे,भोसले, हायस्कूलचे हेडमास्तर मालवण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रभाकर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page