⚡कणकवली ता.०२-: कृषी दिनानिमित्त कणकवली नगरवाचनालयाच्या परिसरात प्रा.चिकोडी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीप पिरखान, डी.पी.तानवडे, रवींद्रनाथ मुसळे, वैयजंती करंदीकर, वाचनालयाचे कर्मचारी राजन ठाकूर, स्नेहा चव्हाण,
पल्लवी कोकणी, स्नेहा अनिल मुसळे यांच्यासह वाचक उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी आपल्या आयुष्यात झाडांचे किती महत्त्व आहे हे उपस्थितांना समजून सांगून झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश दिला. पर्यावरणाचे संतुलन राखू चला । झाडे झाडे जगवू चला। वृक्ष आपले मित्र हेच जीवनाचे सूत्र। प्रेम करा झाडावर। सौख्य मिळेल आयुष्यभर या काव्यपंक्तीद्वारे जनजागृती करण्यात आली
कणकवली नगरवाचनालयाच्या परिसरात वृक्षारोपण
