⚡कणकवली ता.०२-: स्वामी समर्थ मठ निखरे (केळवली ) राजापूर यांच्यावतीने खारेपाटण हायस्कूल प्राथमिक विभागामध्ये मठाच्यावतीने सुमारे 200 वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागातील ज्युनिअर केजी, सिनियर केजी व पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या. या कार्यक्रमाप्रसंगी मठाचे मठाधिपती स्वामी नकाशे हे उपस्थित होते. तसेच खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सानप हे देखील उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
स्वामी समर्थ निखरे मठाच्या माध्यमातून असा उपक्रम राबवल्याबद्दल मठाधिपती स्वामी नकाशे यांचे आभार मुख्याध्यापक श्री सानप यांनी मानले.
