⚡देवगड ता.०१-: मोंड खाडीकिनारी सापडलेल्या पोत्यामध्ये हात पाय धड तोडलेल्या अवस्थेत कुजलेल्या स्थितीत बिबट्याचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार मोंड पोलिस पाटील जितेंद्र राणे यांनी मोंड qचचवड येथे खाडीकिनारी पाण्यात qसमेटच्या पोते आढळले असून कुजलेला वास येत आहे असे देवगड पोलिस स्टेशनला कळविले यानंतर देवगड पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक प्रशांत जाधव यांनी घटनास्थळी जावून पाहणी केल्यानंतर सिमेंटच्या पोत्यात बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला.मृत बिबट्याचे हात पाय व शीर तोडलेले होते.याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी रीतसर पंचनामा करून मृत बिबट्या ताब्यात घेतला.
मोंड खाडीकिनारी सिंमेटच्या पोत्यात बिबट्याचे हात पाय शीर तोडून कुजलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
