कृषी दिनानिमित्त मनसेच्यावतीने शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सन्मान

गुलाबपुष्प व मिठाई भरवून शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या दिल्या शुभेच्छा

⚡कुडाळ ता.०१-: जागतिक कृषी दिनानिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुलाब पुष्प देत मिठाई भरवून शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

शेतकरी वर्ग देखील मनसेच्या सन्मानाने भारावून गेले. यावेळी अनियमित पाऊस, खतांच्या वाढलेल्या किंमती आदी सर्व समस्यांवर शासनाने लक्ष देण्याची गरज असून, चपलांचे मॉल बनले. मात्र शेतकरी अजून रस्त्यावरच विक्री करतोय हे बदलणं गरजेचं असून नुसतं “जय जवान जय किसान” नारा देऊन उपयोग नाही तर परत जगाचा पोशिंद्यावर लक्ष देऊन खऱ्या अर्थाने कृषी क्रांतीची गरज असल्याची भावना मनसे पदाधिकाऱ्यांनी मांडली. यावेळी मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, तालुका सचिव राजेश टंगसाळी, उपतालुकाध्यक्ष अविनाश अणावकर, विभाग अध्यक्ष अनिल कसालकर, प्रसिद्धी प्रमुख गुरू मर्गज, नितीन जाधव, प्रगतशील शेतकरी दिलीप पालव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page