⚡कणकवली ता.०१-: हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिनाचे औचित्य साधुन त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे येथे मुख्याध्यापक वामन तर्फे, कृषी विज्ञान केंद्राचे उपाध्यक्ष प्रदिप सावंत, अधिकारी श्री. भोसले , शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी श्री. भोसले आणि हरित सेना प्रमुख श्री. काणेकर, कृषी महाविद्यालय, किर्लोसच्या विद्यार्थ्यांनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व वृक्ष लागवड गरज-महत्त्व सांगितले. कृषी दिनाचे औचित्य साधुन कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांनी 25 काजू, 5 शेवगा 2लिंबू, 2जाम, 2पेरु, शालेय समिती अध्यक्ष उत्तम गांवकर यांनी 5 नारळ, दिपक चव्हाण-5 नारळश्री.संतोष गांवकर व श्री. दशरथ घाडीगांवकर-5नारळ, मयूर ,कु.हर्षल तर्फे-20,सुपारी, शिक्षक- शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी 20 रतांबे, संतोष गांवकर-2केळी, कु. विशाल घाडीगांवकर-3 केळी.कु.वेदांत कासले-2केळी इत्यादी झाडे देणगी स्वरुपात दिली. संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानून पर्यावरण संतुलनासाठी वृक्षांची जोपासना करावी असे आवाहन मुख्याध्यापक वामन तर्फे यांनी केले.
.
