रुग्णाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी डॉक्टरांचे अथक परिश्रम

अर्चना घारे परब यांची भाऊसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाला भेट:
निमित्त डॉक्टर्स डे चे

⚡सावंतवाडी ता.०१-: १ जुलै या दिवशी प्रख्यात चिकित्सक आणि बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथी देखील आहे. हा दिवस आरोग्य सेवा कर्मचार्‍यांच्या अथक परिश्रम आणि कठोर परिश्रम म्हणून साजरा केला जातो जे जीवन वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम करतात. करोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या कर्तव्याशी तडजोड न करता सर्वत्र साथीच्या रोगाचा सामना करताना डॉक्टरांनी जगाचे नेतृत्व केले.यंदाच्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाची थीम ‘फॅमिली डॉक्टर्स ऑन द फ्रंट लाइन’ अशी आहे. या निमित्ताने आज राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेचे भाऊसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय,सावंतवाडी येथे भेट दिली.समाजातील डॉक्टरांच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा केला जातो. रुग्णांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी डॉक्टर अथक परिश्रम घेतात. आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना त्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाबद्दल धन्यवाद देण्याचा हा दिवस एक चांगला मार्ग आहे अशा भावना अर्चना घारे-परब यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या.

यावेळी घारे परब पुढे बोलताना म्हणाल्या की आजही गावखेड्यांत डॉक्टरांना परमेश्वराचे रूप मानले जाते. दुर्धर आजारातून मुक्त झाल्यावर किंवा अपघातानंतर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा जीवन सुरळीत झाल्यानंतर अनेकांना डॉक्टरांमुळे पुनर्जन्म मिळाला, अशी भावना असते. ते तसे बोलूनही दाखवितात. अनेक रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला ‘देवदूत’ ठरत असतो. त्यांच्या कौशल्याने, ज्ञानाने अनेकांना जीवदान मिळते. भारतात एक जुलै हा दिवस ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधुन अर्चना फ़ाउंडेशन च्या माध्यमातुन कोकण राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा अर्चनाताई घारे परब यानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.डी.पाटील आणि प्राध्यापिका डॉ.सौ.शीतल पाटील यांचा सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व माज़ी नगराध्यक्ष ऍड.दिलीप वसंत नार्वेकर, सचिव गणेश यशवंत बोर्डेकर व गीतेश अनंत पोकळे
, दर्शना बाबर देसाई-निरीक्षक रायगड आणि पूजा पुंडलीक दळवी उपस्थित होते.

You cannot copy content of this page