प.पु.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था खारेपाटणची निवडणूक बिनविरोध

⚡कणकवली ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात सातत्याने अ वर्ग मिळविणाऱ्या खारेपाटण येथील प. पु.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यदित खारेपाटण या सांस्थेच्या सन- २०२२ – २३ ते सन २०२६ -२७ या कालावधीकरिता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संस्थेचे माजी संचालक व सभासदांनी तसेच ग्रामस्थाच्या सहकार्याने या पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध होऊन सर्व १२ उमेदवार विजयी झाले.


प.पु.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या संस्थेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले उमेदवार तथा संचालक पुढीलप्रमाणे —
कणकवली तालुका सर्वसाधारण गट -श्री.ब्रम्हदंडे राजेंद्र गणपत, वारंगे राजेश पांडुरंग,कोरगावकर नंदकिशोर काशीनाथ,पटेल परवेज अल्लीमिया.
वैभववाडी तालुका सर्वसाधारण गट –
श्री .नासिर कमरुद्दीन काझी,संतोष विष्णू हरयाण
देवगड तालुका सर्वसाधारण गट –
श्री . विजय धोंडू कुडतरकर
महिला राखीव प्रवर्ग – सौ.श्रद्धा विजय देसाई,सौ.मनस्वी महेश कोळसुलकर.
अनु.जाती/जमाती प्रवर्ग – संतोष यशवंत पाटणकर .भटक्या विमुक्त जाती,जमाती -विशेष मागास प्रवर्ग -प्रवीण दिगंबर लोकरे
इतर मागास प्रवर्ग -राजेंद्र जयप्रकाश वरूणकर
खारेपाटण येथील प.पु.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक ८जून २०२२ पासून सुरू झाली होती.मात्र १२ जगासाठी एकूण १४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते .यापैकी महिला राखीव गटातील दोन जागासठी एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.यापैकी एक अर्ज छाननीत बाद झाला. तर इतर मागास प्रवर्गामध्ये एका जागेसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते यापैकी एक उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे फक्त १२ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने दि.३० जून २०२२ या नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अंतिम तारीख पर्यंत कोणीच अर्ज मागे न घेतल्यामुळे तालुका सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा साहाय्यक निबंधक कणकवली वैध १२ उमेदवारांना विजयी घोषित करून खारेपाटण नागरी सह.पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याचे लेखी परीपत्रकाद्वारे जाहीर केले.सदर माहिती प.पु.भालचंद्र महाराज नागरी सह.पतसंस्था खारेपाटण च्या मुख्य कार्यलयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा शाखाप्रबंधक श्री शुभम मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकारे दिली.
लवकरच संस्थेच्या निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकाची बैठक होणार असून यामध्ये प.पु.भालचंद्र महाराज नागरी सह पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे.संस्थेचे माजी अध्यक्ष नासिर काझी ,प्रवीण लोकरे यांनी निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सर्व ग्रामस्थ व सभासदाचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page