खारेपाटण कॉलेजचा विद्यार्थी ओम विनोद उन्हाळकर याला मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक

⚡कणकवली ता.३०-: खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित, शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचा विद्यार्थी कु. ओम विनोद उन्हाळकर याने पुणे महानगरपालिका आयोजित, पुणे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. या
पुणे बालेवाडी स्टेडियम वर झालेल्या या 3 किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये साडेतीनशे स्पर्धकांनी भाग घेतला होता. यातील पहिल्या पन्नास विजेत्यांना गोल्ड मेडल देण्यात आले. या साडेतीनशे स्पर्धकांमधून ओम उन्हाळकर याने सतरावा क्रमांक प्राप्त करत गोल्ड मेडल मिळवले.
ओम उन्हाळकर हा खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावी कॉमर्स मध्ये शिकत असून त्याला प्रशालेतील क्रीडा शिक्षक भोर सर, पाडवी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
ओमच्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भिकाजी कर्ले, सेक्रेटरी महेश कोळसुलकर, खजिनदार संदेश धुमाळे, सहसचिव आत्माराम कांबळे, तसेच सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संजय सानप व सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page