करूळ चेक पोस्टवर अनधिकृत दारू वाहतुकीवर कारवाई

दहा लाख ८६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

⚡वैभववाडी ता.२९-: बिगर परवाना दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकावर वैभववाडी पोलिसांनी कारवाई केली आहे. टेम्पो मधील तब्बल 10 लाख 86 हजार 480 किमतीचा दारूसाठा व टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. तर आरोपी राजा माणिकराज नाडार वय 38 रा. अंधेरी पूर्व याच्यावर वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी करूळ येथील पोलिस चेक पोस्टवर करण्यात आली आहे.

आरोपी नाडार हा आपल्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो (नं. एम एच 08-एपी-3272) घेऊन गोव्याहून कोल्हापूरकडे जात होता. करूळ चेक नाक्यावर ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी सदर टेम्पो तपासणीसाठी थांबवला. टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोत अवैध दारू साठा असल्याचे आढळून आले. सदर टेम्पो हा वैभववाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आला. पोलीस नाईक रमेश नारनवर यांनी याबाबतची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली. रॉयल स्टॅग कंपनीची जवळपास 10 लाख 86 हजार 480 किमतीची दारू टेम्पोत आढळून आली आहे. या पार्श्वभूमीवर कणकवलीचे डीवायएसपी श्री. कांबळे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात भेट दिली. या कारवाईमध्ये वैभववाडी पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस हवालदार नितीन खाडे, पोलीस कॉन्स्टेबल हरेश जायभाय यांनी मदत केली. आरोपी नाडार याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय सुरज पाटील करत आहेत.

You cannot copy content of this page