आरवली येथे नेत्र तपासणी, चष्मे वाटप शिबिर संपन्न

श्री देव वेतोबा आणि अर्चना फाऊंडेशनचा उपक्रम

सावंतवाडी ता.२९-:श्री देव वेतोबा आणि अर्चना फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरवली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि चष्मे वाटप उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी २५ गरजू लोकांचे कॅट्राक शस्त्रक्रिया करण्यात आली. या शिबिराला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. यावेळी दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीचे सदस्य, कोकण विभाग राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चनाताई घारे-परब, माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले, श्री वेतोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री राय, डॉक्टर साळगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, आबा टाककर , माजी अध्यक्ष भाई मंत्री, सुनील दळवी, श्री शेटे, सचिन दळवी , दर्शना बाबर देसाई आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते.

You cannot copy content of this page