असरोंडी ग्रा.पं.तर्फे लाभार्थ्यांना कोंबडीच्या पिल्लांचे वाटप

⚡मालवण ता२९-: जिल्हा परिषदेचे माजी वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार असरोंडी गावातील १५ लाभार्थ्यांना ७५० एक दिवसीय कोंबडीच्या पिल्लांचे वाटप करण्यात आले. यासाठी उपसरपंच मकरंद राणे यांनी पाठपुरावा केला.

यावेळी ग्रा. प. सदस्य संजय सावंत, आरती आजगावकर, नेहा गावडे यांच्यासह अन्य लाभार्थी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाबाबत संबंधित लाभार्थ्यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page