⚡मालवण ता.२९-: मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे गुणगौरव सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर कृ. सी.देसाई शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव श्री. गणेश कुशे महाविद्यालय प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत, रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.हसन खान, प्रा. हर्षदा धामापूरकर, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. एम.आर.खोत, प्रा. डॉ. सुमेधा नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवून या वर्षी महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक कु. राहुल राजकुमार वालावलकर, द्वितीय क्रमांक कुमा.निकिता रामनारायण शर्मा, तृतीय क्रमांक दिव्या विजय निकम तर कला शाखेतून प्रथम क्रमांक कु. पौर्णिमा प्रकाश गावडे, द्वितीय क्रमांक कु. सर्वेश यशवंत कुबल आणि कु. लोपेश अरुण परब, तृतीय क्रमांक कु.बिरु बाळसो खरात यांना महाविद्यालयातर्फे भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी श्री. पंतवालावलकर यांनी या यशामध्ये महाविद्यालय व शिक्षक यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. आपण याची जाण ठेऊन महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी आपल्या परीने योगदान द्यावे. इथून मिळालेल्या ज्ञानातून सर्वांगीण विकास करून स्वतःची प्रगती साधावी, असे सांगितले. यावेळी श्री. कुशे यांनी बालवाडी पासून ते महाविद्यालयीन शिक्षण या संस्थेतून दिले जाते याचा आढावा घेतला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांमधून राहुल वालावलकर, निकिता शर्मा यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.हसन खान यांनी तर सुत्रसंचलन प्रा. स्नेहा बर्वे यांनी आणि आभार प्रा.मिलन सामंत यांनी मानले.
