संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ९५ प्रकरणांना मंजुरी

⚡मालवण ता.२९-: मालवण तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेची बैठक समितीचे तालुका अध्यक्ष मंदार केणी व तहसीलदार अजय पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण तहसील कार्यालय येथे बुधवारी पार पडली. या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ९५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

यावेळी समिती सदस्य सुनील पाताडे, गणेश कुडाळकर, भाऊ चव्हाण, प्रमोद कांडरकर, महेंद्र मांजरेकर, अनुष्का गावकर व अधिकारी उपस्थित होते. लाभार्थ्यांचे मागील काही महिन्यांचे अनुदान रखडले होते. यापैकी अनुसूचित व जनरल विभाग अनुदान शासनाकडून प्राप्त झाले आहे. लाभार्थ्यांकडे जमा केले जाईल. अन्य अनुदानही लवकर मिळेल, अशी माहिती मंदार केणी यांनी दिली.

You cannot copy content of this page