⚡मालवण ता.२९-: त्रिंबकचे माजी सरपंच चंद्रशेखर सुतार यांनी आचरा- कणकवली मार्गावर त्रिंबक येथे सापडलेले पैशाचे पाकीट मूळ मालकास परत करत प्रामाणिकपणाचे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. श्रावणचे तलाठी नामदेव देसाई हे मालवण-आडवली असा प्रवास करत असताना त्यांचे पैशाचे पॉकीट हरवले. हे पाकीट सुतार यांना विस्कटलेल्या अवस्थेत आचरा-कणकवली मार्गावरील त्रिंबक साटमवाडी येथे मिळाले. सुतार यांनी पाकीट देसाई यांचे असल्याची खात्री पटल्याने आचरा मंडल ऑफीस येथे जाऊन ‘पाकीट परत केले.
पाकीटात ९ हजार ६०० रुपये रोख ‘व महत्वाची कागदपत्रे होती. यावेळी मंडल अधिकारी अनिल परब, आचरा तलाठी काळे, चिंदर भटवाडी तलाठी योगेश माळी, बाबू कदम उपस्थित होते.
