मालवण तालुका भंडारी संघातर्फे १० रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

⚡मालवण ता.२९-: मालवण तालुका भंडारी संघाच्या वतीने इयत्ता दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा १० जुलैला सकाळी साडे दहा वाजता भरड येथील लीलांजली हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.

मालवण तालुका भंडारी संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष रवी तळाशीलकर, प्रदीप वेंगुर्लेकर, मोहन वराडकर, राजेंद्र आंबेरकर, भाऊ हडकर, सागर हडकर, यजुवेंद्र हडकर, पंकज पेडणेकर आदी उपस्थित होते

भंडारी समाजातील ज्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के गुण मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रतिसह पंकज पेडणेकर- ९४२३३७३०८९, राजेंद्र आंबेरकर – ८८५७८३७४१९, सुनील नाईक कट्टा – ९४०४३९९६१३९, भाऊ नार्वेकर काळसे ९४२२६४५७५७, बाबू परुळेकर आचरा- ९४२२५७६४४२ यांच्याकडे ४ जुलैपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page