⚡मालवण ता.२९-: हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त मालवण पंचायत समिती, राज्य शासानाचा कृषी विभाग व हेदूळ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता हेदूळ पूर्ण प्राथमिक शाळा येथे कृषी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यामध्ये विशेष अतिथी व उद्घाटक म्हणून आमदार वैभव नाईक, गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी कृषी व संलग्नग्न विभागाकडील विविध योजना व सुधारित कृषी तंत्रज्ञानाबाबत तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, नंददीपक गावडे यांनी केले आहे.
