जाधववाडी मागासवर्गी वस्तीतील घरे धोक्यात आणल्यासंदर्भात केली चर्चा
⚡सावंतवाडी ता.२९-; जिमखाना मैदान येथील ग्राउंडचा विस्तार वाढवण्यासाठी नगरपरिषदेने कशाप्रकारे चुकीचं काम करून जाधववाडी मागासवर्गी वस्तीतील 16 घरे धोक्यात आणल्यासंदर्भात आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रांताधिकारी पनवेलकर यांची भेट घेतली.
पालिकेच्या चुकीच्या कामामुळे जाधववाडीतील तब्बल16 घरे घळणीच्या खाली कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहेत, याची त्यांना जाणीव करून दिली. या परिस्थितीची पाहणी करून या संदर्भात सविस्तर माहिती साळगावकर यांनी प्रांताधिकारी यांना दिली असता प्रांताधिकारी पनवेलकर आज दुपारी 2 वाजता माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना घेऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
