चालकाच्या प्रसांगवधामुळे मोठा अनर्थ टळला…
⚡सावंतवाडी ता.२९-: रस्त्यावर पडलेल्या ऑईल मुळे माजगाव नाला गुलाबी तिठा येथे कोल्हापूर वेंगुर्ला बसला अपघात झाला असून, एस्टी बस चे चाक घसरुन एस्टी घळणीत गेली. परंतु, एस्टी चालकाने दाखविलेल्या प्रसांगवधानामुळे मोठा अपघात टळला आहे. हा प्रकार आज बाराच्या सुमारास घडला असून, स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने एस्टी बस बाहेर काढण्यात यश आले आहे. या अपघातात कोणीही जख्मी झाले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
