४०९ मिमी पाऊस पडला आहे कमी
सिंधुदुर्गनगरी ता २७
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस पाउसाचा जोर कायम असून गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ७८ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोद झाली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले असून गतवर्षीच्या तुलनेत सरासरी ४०९ मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. गतवर्षी सरासरी १०१९.६ मिलीमीटर तर यावर्षी केवळ ६१०.५ मिलीमीटर एवढाच पाऊस झाला आहे.
यावर्षी गतवर्षीपेक्षा पाउसाचे प्रमाण कमी राहिले आहे.गतवर्षी २७ जून पर्यंत सरासरी १०१९.५ मिलीमीटर पाऊस झाला होता तर यावर्षी २७ जून पर्यंत केवळ सरासरी ६१०.५ मिलीमीटर एवढाच पाऊस झाला आहे . गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत सरासरी ४०९ मिलीमीटर एवढा पाऊस कमी पडला असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्तापन विभागाच्या अहवाला वरुन स्पस्ट झाले आहे.
जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात मालवण
तालुक्यात सर्वाधिक १०९.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ७८.० मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी ६१०.५ मि.मी. पाऊस झाला आहे.
देवगड तालुक्यात ८२.२(६०७.७),मि मी, मालवण -१०९.३(६५८.८), मि मी, सावंतवाडी-५६.९ (६७०.४), मि मी, वेंगुर्ला-४४.४(५५७.०) मि मी कणकवली-७६.५ (५३८.८),मि मी, कुडाळ-९८.६(६४०.५),वैभववाडी-५८.५(५७५.०), मि.मी,
दोडामार्ग-३८.७(५९१.१), मिलीमीटर असा पाऊस झाला आहे. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात पाऊसाचा जोर वाढला असून शेतीच्या काम जोरदार सुरु झाले आहे. शेतकऱ्या मध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यात २४ जून पासून पाउसाचा जोर वाढला असून आजही कायम आहे. मात्र जिल्ह्यात कोठेही मोठ्या नुकसानीच्या घटना घडलेल्या नसल्याचे आपत्ती व्यवस्तापन कक्षाकडून सांगण्यात आले.
