ग्रामपंचायत खारेपाटण व रोटरी क्लब ऑफ मुंबई यांचे सहाकार्य
⚡कणकवली ता.२७-: खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने व रोटरी क्लब ऑफ मुंबई शाखा महिम यांच्या सौजन्याने आणि सयूंक्त विद्यमाने खारेपाटण व परिसरातील नागरिकांसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक व वातानुकूलित “शवपेटीचे ” लोकार्पण खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून फित कापून करण्यात आले.
या कार्यक्रमाला खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम, खारेपाटण सोसायटीचे संचालक विजय देसाई,भाऊ राणे,सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर,संकेत शेट्ये,सुधीर कुबल,खारेपाटण प्रा आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम ग्रा प सदस्य महेंद्र गुरव,योगेश पाटणकर,शमशुद्दीन काझी,सौ रीना ब्रम्हदंडे आरोग्य सहायक श्री भागवत आदी मान्यवर उपस्तीत होते.
खारेपाटण येथील नागरिकांची गरज ओळखू त्याच्या सोयीच्या दृष्टीने ही अत्याधुनिक “शवपेटी” खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीनें खरेदी करण्यात आली असून असून त्याला रोटरी क्लब ऑफ मुंबई यांनी आर्थिक सहकार्य केल्यामुळे शवपेटी घेण्यात आली असल्याचे सरपंच रमाकांत राऊत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर,विजय देसाई, डॉ.प्रिया वडाम यांनी देखील “शवपेटी” लोकार्पण सोहळ्यानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार खारेपाटण प्रा आ केंद्राचे कर्मचारी ऋषिकेश जाधव यांनी केले.
