प्रभाग क्र. २ मध्ये वाढलेली मतदार संख्या नियमीत करा

माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांची नगरपरिषदेक मागणी

⚡सावंतवाडी ता.२७-: : नवीन प्रभाग रचनेनुसार सावंतवाडी नगरपरिषद प्रभाग क्र. २ मध्ये वाढलेली मतदार संध्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहाणी करून नियमीत करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेविका दिपाली दिलीप भालेकर यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदनद्वारे केली.

या निवेदनात भालेकर यांनी म्हटले की, सावंतवाडी शहरातील भटवाडी-बाहेरचावाडा परिसरामध्ये नगरपरिषद प्रभाग क्र. २ येत आहे. नवीन प्रभागरचनेनुसार सदर प्रभाग क्र २ च्या यादीमध्ये २४०० पेक्षा जास्त मतदार संख्या दाखविण्यात आली असून ही मतदार संख्या वाजवीपेक्षा जास्त आहे. यापूर्वी सदर वॉर्डमध्ये सुमारे २१०० एवढी मतदार संख्या होती. नवीन प्रभाग रचनेनुसार नगरपरिषद प्रभाग क्र. २ मधील मतदार संख्या ही जास्त असून आताच्या प्रभाग क्र. १ व ४ मधील जादा मतदार प्रभाग क्र. २ मध्ये समाविष्ट करण्यात आले असून त्यामुळे ही मतदार संख्या वाढलेली आहे.

शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये मतदारांची संख्या १६०० ते १९०० एवढी असून आमच्या प्रभाग क्र. २ मध्ये दाखविण्यात आलेली २४०० ही मतदार संख्या त्यामानाने खूपच जास्त आहे. तरी प्रभाग क्र. २ मध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहाणी करावी आणि नवीन प्रभाग रचनेनुसार नगरपरिषद प्रभाग क्र. २ मध्ये वाढलेली मतदार संध्या सुमारे १९०० ते २००० पर्यंत नियमीत करण्यात यावी, अशी मागणी भालेकर यांनी केली.

तसेच सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ करितां नवीन प्रभागरचना करण्यात आलेली असून नवीन प्रभाग रचनेनुसार नवीन मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. सदर मतदार याद्यांसंदर्भात हरकती व सुचना देण्याची मुदत आज दिनांक २७/०६/२०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे. सदर मुदत ही कमी वाटत असून हरकती व सुचना देण्याची मुदत आठ दिवसांनी वाढवून मिळावी, अशीही मागणी भालेकर यांनी निवेदनातून केली आहे.

You cannot copy content of this page