चिंतामणी साहित्य सहयोग संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभाउत्साहात संपन्न

⚡सावंतवाडी ता.२५-: येथील चिंतामणी साहित्य सहयोग संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीराम वाचन मंदिरमध्ये दिनकर भागवत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात खेळीमेळीत पार पडली.
प्रारंभी प्रभाकर भागवत यांनी उपस्थितांचे स्वागत करून सभेची रुपरेषा स्पष्ट केली.

यावेळी दिवंगत साहित्यिकांना श्रद्धांजलीअर्पण करण्यातआली
तसेच इतिवृत्त वाचन, अहवाल वाचन करून सभेत मंजूरी घेण्यातआली. यासभेत भागभांडवल वाढविण्यासाठी चर्चा करून ठराव मंजुरी घेण्यात आली आरती मासिकचे सभासद वाढविणे, दिवाळीअंक दर्जेदार करण्यासाठी प्रयत्न करणे यावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी को. म. सा. परिषद शाखा रत्नागिरीवतीने देण्यात येणारा साहित्यिक पुरस्कार कवयित्री संध्या तांबे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यातआला. यावेळी अध्यक्ष दिनकर भागवत, उषा परब, प्रभाकर भागवत, भरत गावडे, वाय. पी. नाईक, कल्पना बांदेकर, नकुल पार्सेकर, सुहासिनी सडेकर, प्रा. मुक्कणावरआदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. भरत गावडे यांनी आभार मानले

You cannot copy content of this page