माजगाव येथील दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सेनेचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष विक्रांत सावंत यांची प्रमुख उपस्थिती

⚡सावंतवाडी ता.२६-; माजगाव गावातील दहावीच्या परीक्षेत चांगले गुण घेऊन पास झालेल्या विद्यार्थी आणि पालक यांचा सत्कार शिवसेना माजगाव विभागीय अध्यक्ष आणि सावंतवाडी विधानसभा प्रमुख सन्मानीय विक्रांत विकासभाई सावंत यांच्या हस्ते करण्यात आला विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस माजगाव शिवसेनेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी माजी सभापती अशोक दळवी, माजी सरपंच आबा सावंत, विभाग प्रमुख माजगाव संजय माजगावकर, सरपंच दिनेश सावंत, उपसरपंच संजय कानसे, योगेश सावंत, नरहरी, राकेश पवार, राजेश पवार उपस्थित होते

You cannot copy content of this page