*उद्धव ठाकरेंना बळ देण्यासाठी सोमवारी होणाऱ्या भव्य रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा

शिवसेना नेते संदेश पारकर यांचे आवाहन*

वेंगुर्ले

     शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना महामारी, तौक्ते वादळ व अन्य संकटे असतानाही न डगमगता कार्य केले आहे.एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मान्यता मिळविली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना बळ देण्यासाठी सोमवारी सावंतवाडी येथे होणाऱ्या भव्य रॅलीत वेंगुर्ले तालुक्यातील सर्वच पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी वेंगुर्ले येथे केले.

    वेंगुर्ले साई दरबार हॉल येथे शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवारी वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची बैठक पार पडली.यावेळी जिल्हा संघटिका जान्हवी सावंत,वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब, हर्षद गावडे, वेंगुर्ले शहरप्रमुख अजित राऊळ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सुनिल डुबळे, सचिन देसाई, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, माजी नगरसेवक तुषार सापळे, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, तालुका महिला संघटिका सुकन्या नरसुले, युवासेनेचे पंकज शिरसाट, संजय गावडे, दाभोली सरपंच उदय गोवेकर, वायंगणी सरपंच सुमन कामत, अण्णा वजराटकर, अनन्या धावडे,कोमल सरमळकर,अरुणा माडये, मनाली हळदणकर, सावली आडारकर,रश्मी डिचोलकर,समृद्धी कुडव,माजी सभापती सुचिता वजराटकर, नम्रता बोवलेकर, वैष्णवी वायंगणकर, रश्मी डिचोलकर,शितल साळगावकर, हर्षा परब, रितू राऊळ, रश्मी गावडे, मनिषा नेवाळकर,टीना आलमेडा आदीसह अन्य पदाधिकारी व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

     यावेळी बोलताना संदेश पारकर म्हणाले की,शिवसैनिक ही शिवसेनेची ताकद आहे.त्यामुळे शिवसेनेसोबत एकनिष्ठेने रहा व संघटना वाढवा.येणाऱ्या काळामध्ये जि.प.,पं. स.,नगरपालिका सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे.यावेळी जान्हवी सावंत,यशवंत परब यांनीही मार्गदर्शन केले.यशवंत परब यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ होणाऱ्या रॅलीत वेंगुर्ले तालुक्यातून सर्वच पदाधिकारी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील,असे सांगितले.आमदार दिपक केसरकर यांनी बंड पुकारले तरी वेंगुर्ले तालुक्यात काहीही फरक पडणार नाही.वेंगुर्लेतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहील,असेही परब म्हणाले.यावेळी शिवसेना तालुका कार्यालयासमोर पदाधिकारी व महिला यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

फोटो : शिवसेना तालुका कार्यालयासमोर घोषणाबाजी वेळी उपस्थित संदेश पारकर,यशवंत परब,जान्हवी सावंत, अजित राऊळ, सचिन वालावलकर,अस्मिता राऊळ,सुकन्या नरसुले व अन्य 

You cannot copy content of this page