डेगवे येथे कृषी संजीवनी कार्यक्रमाचा शुभारंभ

⚡बांदा ता.२५-:
बांदा कृषी मंडळ अंतर्गत डेगवे येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत कृषि संजीवनी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमाअंतर्गत येथील स्वप्निल विठ्ठल देसाई यांच्या कोकण फूड अँड स्पायसेस या युनिटचे उद्घाटन तालुका कृषि अधिकारी प्रमोद बनकर, माजी सरपंच मधुकर देसाई यांचे हस्ते करण्यात आले.


सदर युनिट प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत तयार करण्यात आले आहे. त्यास जिल्हा मध्यवर्ती बँक, बांदा शाखेचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना कृषी पर्यवेक्षक अजमुद्दीन सरगुरू यांनी केली. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत तसेच कृषि विभागाच्या योजनांची माहिती मंडळ कृषी अधिकारी प्रकाश घाडगे यांनी दिली. प्रकल्प तयार करणेबाबत या योजनेचे डिआरपी प्रताप चव्हाण आणि योजनेची परिपूर्ण माहिती श्री. बनकर यांनी दिली. सदर योजनेमधून आपल्या तालुक्यातून जास्तीतजास्त नवीन व जुन्या उद्योजकांनी पुढे यावे त्यांना योजनेबाबत पूर्ण सहकार्य करण्यात येईल असे सांगून उद्योगास सहकार्य केलेबाबत जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व संचालक महेश सारंग यांना धन्यवाद दिले. यानंतर मधुकर देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. पप्पू देसाई यांनी प्रकल्प तयार करताना आलेले अनुभव व्यक्त केले. सदर कार्यक्रमास उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी आर. जी. पाटील, डेगवे सोसायटीचे राजन देसाई, प्रगतशील शेतकरी विठ्ठल देसाई, आबा देसाई, उत्तम देसाई, सुशील देसाई, उद्योजिका श्रीम. गावडे, अभिनव उद्योग प्रबोधिनी गृप कुडाळचे श्री. पार्सेकर, कृषी सहाय्यक श्री. गाड, श्रीम. देसाई, श्रीम वसकर, श्रीम.बेळगुंदकर, डेगवे सजेचे कृषी सहायक अतुल माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page