सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार सचिवपदासाठी देवयानी वरसकर यांना भगवान लोके यांचा पाठिंबा

खजिनदार पदासाठी आनंद लोके यांचा संतोष सावंत यांना पाठिंबा; निवडणूक बिनविरोध होणार

⚡कणकवली ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया बिनविरोध व्हावी, यासाठी सचिव पदासाठी कणकवली तालुका माजी अध्यक्ष भगवान लोके यांनी ओरोस येथील देवयानी वरसकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर खजिनदार पदासाठी देवगडच्या आनंद लोके यांनी सावंतवाडीच्या संतोष सावंत यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक बहुतांशी बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे,सचिव उमेश तोरस्कर, माजी अध्यक्ष संतोष वायंगणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणुक बिनविरोध करण्यासाठी महत्वपूर्ण संवाद बैठक पार पडली.यावेळी उपाध्यक्ष रमेश जोगळे,सहसचिव देवयानी वरसकर,बाळ खडपकर,हेमंत कुलकर्णी, आनंद लोके,दिनेश साटम,महेश सरनाईक,तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई,भगवान लोके, संजय राणे,सुधीर राणे, लक्ष्मीकांत भावे ,रवी गावडे,अजय सावंत आदी उपस्थित होते.

पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी उमेश तोरस्कर व संदीप देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.मात्र ज्येष्ठ पत्रकारांच्या चर्चेंअती शुक्रवारी संदीप देसाई यांनी उमेश तोरस्कर यांना पाठिंबा दिला होता.मात्र,सचिव व खजिनदार या पदासाठी निवडणूक होणार होती.परंतु जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये निवडणुकीमुळे विसंवाद व कटुता येऊ नये यासाठी कणकवली तालुक्यातील पत्रकारांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार तालुक्यातील पदाधिकारी व जेष्ठ पत्रकारांनी भगवान लोके यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली .त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देत भगवान लोके यांनी सचिव पदासाठी देवयानी वरसकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय जिल्हाध्यक्ष ,सचिव,जेष्ठ पत्रकारांना कळविण्यात आला.
त्याच वेळी देवगडच्या आनंद लोके यांनी खजिनदार पदासाठी संतोष सावंत यांना पाठिंबा देत ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी पाठींबा दर्शविला.

You cannot copy content of this page