केंद्रीयमंत्री राणेंवर टीका करण्याऐवजी आम.नाईक यांनी आपल्या पक्षावर बोलावे

आम. केसरकर यांच्याबाबत पक्षश्रेष्‍ठी,घेतील तो निर्णय आम्‍हाला मान्य असेल:राजन तेली

⚡कणकवली ता२५-: नशिबाने आमदार झालेल्या वैभव नाईक यांची केंद्रीयमंत्री राणेंवर टीका करण्याएव्हढी पोच नाही महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. केंद्रीयमंत्री राणेंवर आ.वैभव नाईक यांनी टीका करण्याऐवजी स्वतःची पक्षबद्दल भूमिका मांडणे योग्य होते. आज सेनेसोबत असलेले वैभव नाईक हे उद्या गुवाहाटीला पोहचले तर आश्चर्य वाटायला नको. असा टोला भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी लगावला. असेल.तसेच आम.दिपक केसरकर शिंदे गटात गेल्याने त्यांच्याबाबत कोकणच्या हितासाठी पक्षश्रेष्‍ठी जो निर्णय घेतील तो आम्‍हाला मान्य असेल अशी भूमिका भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेली यांनी मांडली.

कणकवली येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप जिल्‍हाध्यक्ष
राजन तेली बोलत होते.

राजन तेली म्हणाले,राज्यात सत्ताबदल व्हावा ही राज्यातील जनतेची इच्छा आहे. भाजपामध्ये कुठल्या नेत्याने काय जबाबदारी पूर्ण करायची हे पूर्वनियोजित असते. राज्यात जेव्हा 12 जिल्ह्यातील शिवसेनेचे 48 आमदार आणि खासदार शिवसेना नेतृत्व असलेल्या उद्धव ठाकरेंविरोधात आपली खदखद व्यक्त करतात. यावरूनच उद्धव ठाकरेंवर अविश्वास उघड होतो. राज्यात मुख्यमंत्री फडणवीस व्हावे आणि शिवसेनेने भाजपा सोबत युती करून सत्तेत यावे हा जनादेश होता. मात्र सत्तेसाठी शिवसेनेने अनैसर्गिक अशी महाविकास आघाडी केली. त्याचा तोटा शिवसेनेच्या आमदारांना अडीच वर्षात झाला. वैभव नाईक यांनी निष्ठावान म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत स्वतःची मिरवणूक काढणे हे जरी योग्य असले तरी त्यांनी केंद्रीयमंत्री राणेंवर नाहक टीका करू नये असा सल्ला तेली यांनी दिला. राज्यात सुरू असलेले विकासप्रकल्प हे केंद्र सरकारमुळे झालेत. कोकण रेल्वेचे विद्युतीकरण हे केंद्र सरकारने केले.

आमदार दीपक केसरकर सातत्‍याने आमच्यावर दहशतवादाचा आरोप करायचे. पण आता त्यांना शिवसेनेचा दहशतवाद समजला असेल, मातोश्रीवरून त्‍यांची गाडी जाऊ दिली नाही. त्‍यामुळे खरे दहशत निर्माण करणारे कोण हे देखील त्‍यांच्या लक्षात आले असेल.
दीपक केसरकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. भविष्यात भाजपची सत्ता आल्‍यानंतर पक्षश्रेष्‍ठी श्री.केसरकर यांच्या बाबतीत जो निर्णय घेतील आणि आम्‍हाला ज्‍या सूचना देतील त्‍या आम्‍हाला मान्य असतील. असे राजन तेली यांनी सांगितले।.

You cannot copy content of this page