उदय खानोलकर वाचन मंदिर आणि मुक्ताई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधी
मळगाव येथिल (कै.) उदय खानोलकर वाचन मंदिर व सावंतवाडी येथिल मुक्ताई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी-विद्यार्थींनीसाठी रविवार दिनांक ३ जुलै रोजी एक दिवसीय मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर रमाकांत सुर्याजी खानोलकर सभागृहात सकाळी ९ ते दुपारी १.३० यावेळात आयोजिले असून या शिबिरात पहिली पासून महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थिनींना भाग घेता येईल. या शिबिरात मुक्ताई अकॅडमीचे कौस्तुभ पेडणेकर व त्यांचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी मार्गदर्शन करणार आहेत. या शिबीरसाठी फक्त ४० प्रशिक्षणार्थी भाग घेऊ शकतात. आपली नावनोंदणी वाचनालयात (सुट्टीचा वार वगळता) सकाळी ९ ते १२ व दुपारी ४ ते ७ यावेळेत नोंदवावीत. तसेच मोबाईलवर हेमंत खानोलकर 9881713938, गुरुनाथ नार्वेकर 8855079346, बी. एस. मुळीक 9422390604 या नंबरवर तारीख 30 जून 2022 रोजी पर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन वाचनालय संचालक मंडळ व मुक्ताई अकॅडमी तर्फे करण्यात आलेले आहे.

You cannot copy content of this page