नांदगाव येथील शेतकऱ्यांना कृषिदूतांकडून मार्गदर्शन

⚡कणकवली ता.२५-: शेतीचे ज्ञान घेऊन उत्पादनवाढ अथवा आर्थिक उन्नती होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष मातीमध्ये उतरून शेतकऱ्यांनी काम केल्यास यश मिळाणार आहे,’ असे मार्गदर्शन कृषिदूतांनी नांदगाव येथे शेतकऱ्यांना केले आहे. ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभवांतर्गत शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन व ॲझोला उत्पनाबद्दल माहिती दिली.

कृषिदूतांनी सेंद्रिय व रासायनिक बीजप्रक्रिया, सरीवाफा पद्धत, माती परीक्षणाबद्दल जागरुकता करून माहिती दिली. यावेळी प्रगतशील शेतकरी राजू तांबे, वामन तांबे, बंटी पाटील,तात्या पारकर, विठोबा कांदळकर, शंकर म्हसकर, शामशंकर तांबे, मंगेश बोभाटे तसेच कृषी सहाय्यक श्रीमंतराजे बुधावले यांचे सहकार्य मिळाले. यावेळी कृषिदूत हर्षवर्धन गायकवाड, आकाश कांबळे, शुभम देसाई, रोहित लांडगे, श्रीकांत मोहिते, पोद्दगौनी श्रीनाध, छल्ला प्रशांत, नल्लाबोतूल्ला पोलेश्र्वराव उपस्थित होते. तसेच प्राचार्य डॉ. मोहिते सर, प्रा.वारे सर, प्रा.मोठे सर, प्रा.जंगले सर, प्रा.शिर्के सर यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page