*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शासकीय संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे प्रश्न गेली कित्येक वर्षे शासन दरबारी प्रलंबित आहेत. तसेच अनेक मागण्याही प्रलंबित आहेत. तसेच १० महिन्यांचे थकीत मानधन मिळावे या प्रमुख मागणी सह अभा प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समिती सिंधुदुर्गच्या वतीने २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येणार आहे. तसा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शासकीय संस्थांमध्ये रत्नागिरी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत सुरक्षा रक्षकांचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र या सुरक्षा रक्षकांचे अनेक प्रश्न गेली ८ वर्षे प्रलंबित आहेत. शिवाय जिल्ह्यातील अनेक सुरक्षा रक्षकांच्या गेल्या १० महिन्यांपासून मानधन थकीत आहे. यात आय टी आय मधील सुरक्षा रक्षकांना ८ महिन्यांचा, आरोग्य व टेक्निकल विभागातील सुरक्षा रक्षकांना १० महिन्यांचा तसेच पॉलिटेक्निक विभागातील सुरक्षा रक्षकांना ३ महिन्यांचे मानधन अद्याप देण्यात आलेले नाही. ते तत्काळ देण्यात यावे. तसेच आय टी आय व टेक्निकल विभागातील तीन पैकी एक सुरक्षा रक्षक पद कमी करण्याबाबत ६ जानेवारी २०२१ रोजी सहसंचालक व प्राचार्य यांच्या व्हीसी दरम्यान घेण्यात आलेला निर्णय बदलून ही पदे कायम ठेवावीत आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समिती सिंधुदुर्गच्या वतीने २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येणार आहे. तसा इशाराही सुरक्षा रक्षक एकता समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विजय गुरव, विद्याधर रेडकर, नितीन कांबळे, भूषण परब आदी उपस्थित होते. ….या आहेत प्रमुख मागण्या सुरक्षा रक्षकांना पिवळी नोंदणी पावती मिळावी नियुक्ती नुसार रजिस्ट्रेशन नंबर मिळावा ओळखपत्र मिळावे, सुरक्षा रक्षकांना ई एस आय च्या सुविधा लागू कराव्यात सुरक्षा मंडळाकडे सुरक्षा रक्षकांची स्वतंत्र फाईल असावी सुरक्षा किट मिळावे, सुरक्षा रक्षक मंडळाचे जिल्ह्यात कार्यालय व्हावे थकीत मानधन मिळावे पगाराची पावती मिळावी
सुरक्षा रक्षकांच्या थकित मानधनासाठी 26 जानेवारी ला सुरक्षा रक्षक समितीचे उपोषण
