भाजप नेत्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतसाठी भरीव निधी देणार असल्याची दिली ग्वाही
*💫सावंतवाडी दि.१९-:* शिवसेनेच्या ताब्यातील मळगाव ग्रामपंचायत भाजपने खेचून आणत मळगाव ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा फडकविला. या विजयानंतर भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी मळगावमध्ये भेट दिली. भाजप नेत्यांच्या माध्यमातून मळगाव ग्रामपंचायतसाठी भरीव निधी देणार असल्याची ग्वाही राणे यांनी दिली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी मनोगत व्यक्त करताना, केवळ कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी नेते ग्रामपंचायतमध्ये येतात. यामागे त्यांची तळमळ दिसून येते. निलेश राणे यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत संजू परब यांनी व्यक्त केले. शिवसेना आ. दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात भाजपने मारलेली मुसंडी कौतुकास पात्र आहे. भाजपने शिवसेनेच्या घशातून सत्ता खेचून आणली. भाजप नेत्यांच्या माध्यमातून मळगाव ग्रामपंचायतसाठी भरीव निधी देणार असल्याचा शब्द माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केल. तर लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी भाजप नेत्यांच्या साथीनं प्रयत्न करणार असल्याच मत जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केले. याप्रसंगी भाजपच्या विजयी उमेदवारांचा सन्मान करण्यात आला.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, युवा नेते विशाल परब, राजू परब, चंद्रकांत जाधव, गणेशप्रसाद पेडणेकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
