शिवसेनेला मिळालेल यश हे जनशक्तीच धनशक्तीच नाही
*💫वेंगुर्ला दि.१९-:* ग्रामपंचायत निकालावरून राजन तेलींनी आमदारकीचे स्वप्न पाहू नये, असा टोला शिवसेना उपजिल्हाप्रमुख आबा कोंडसकर यांनी राजन तेली यांना प्रसिद्धीपत्रकातून लगावला आहे. शिवसेनेला मिळालेल यश हे जनशक्तीच असून धनशक्तीच नाही, हे राजन तेली यांनी लक्षात घ्याव आणि आमदारकीच स्वप्न पहावे,असा सल्लाही कोंडसकर यांनी तेलींना दिला. या प्रसिद्धीपत्रकात कोंडसकर म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या एकूण ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ग्रामपंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकला असून काँग्रेस राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीने भारतीय जनता पाटीर्चे पानिपत केला असे आबा कोंडसकर म्हणाले. महाराष्ट्रात मिळालेले यश पाहता यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारवर जनता समाधानी असल्याचं सिद्ध होत आहे. भाजपच्या सूडाच्या आणि कुटील राजकारणाला महाराष्ट्रीय जनतेने हद्दपार केल असल्याच मतही कोंडसकर यांनी व्यक्त केल. आम्ही ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढविल्या नव्हत्या. ग्रामपंचायत पातळीवर आघाडीबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले होते. तरीसुद्धा शिवसेनेने जिह्यात चांगले यश संपादन केल आहे. आम्हाला मिळालेल यश जनशक्तीच असून धनशक्तीच नाही, हे राजन तेली यांनी लक्षात घ्याव आणि आमदारकीच स्वप्न पहावे,असा सल्लाही कोंडसकर यांनी तेलींना दिला.
