राजकीय घडामोडींची पाश्वभूमी: आ केसरकर यांच्या घराला कडक संरक्षण
⚡सावंतवाडी,ता.२४-: एकनाथ शिंदे गटाशी आमदार दिपक केसरकर सामील झाल्याने “त्या” पार्श्वभूमीवर आज त्यांच्या निवासस्थानी दंगल नियंत्रक पथक तैनात करण्यात आले आहे.
तसेच सायंकाळी या पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या नेतृत्वाखालील शहरात संचलन केले. सद्यस्थितीत निर्माण झालेल्या परिस्थितीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे संचलन करण्यात आले,
