विद्या वालावलकर हीचा जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीने केला सत्कार

ओरोस ता.२४-:

दहावी परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकासह कुडाळ तालुक्यात प्रथम आलेल्या कुडाळ हायस्कूलच्या विद्या दत्तप्रसाद वालावलकर हीचा सत्कार जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीच्यावतीने करण्यात आला.


जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीचे सदस्य असलेल्या दत्तप्रसाद वालावलकर यांची विद्या ही कन्या आहे. त्यामुळे शुक्रवारी मुख्यालय पत्रकार समितीच्या वतीने भेटवस्तू, सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. मुख्यालय पत्रकार समितीचे अध्यक्ष संजय वालावलकर यांच्याहस्ते विद्या हीचा हा सन्मान करण्यात आला. यावेळी वडील दत्तप्रसाद वालावलकर, आई प्राजक्ता वालावलकर, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, संदीप गावडे, मनोज वारंग, प्रशांत राऊत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page