⚡कणकवली ता.२४-: केरळ मल्लपुरम येथून पायी मक्का मदीना हज यात्रेसाठी तब्बल 8500 किलोमिटर प्रवास करीत सिहान चतुर हा युवक पाकिस्तान, इराक, इराण सौदी अरेबिया इथे निघाला आहे.
या युवकाचे कणकवलीत स्वागत करण्यात आले.
कणकवली येथे त्याचे आगमन 24 जून रोजी 11 वाजता कणकवली शासकीय विश्रामगृह येथे झाले. तेथे कणकवली तालुका मुस्लिम समाजाच्यावतीने कणकवली तालुका मुस्लिम समाज अध्यक्ष आसिफ नाईक, सेक्रेटरी अजीम कुडाळकर ,उपाध्यक्ष बड़ेमिया शेख, हनीफ पिरखान, अब्दुल नाईक यांनी स्वागत केले .त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .त्यावेळी संदीप मेस्त्री, राजू गवाणकर सलाउद्दीन कुडाळकर, आक़िब कुडाळकर, निसार शैख़, अबिद नाईक, इम्रान शैख़, अनीस नाईक, जावेद शैख़ वसीम फकीर, इम्रान निशानदार, जावेद फकीर, असलम निशानदार, सलीम नाईक, अमजद शैख़ शोएल खान, शकील बाग़वन, सादिक कुडाळकर,नासीर शैख़, राजू खान, आमिर कुट्टी, मौलाना शाकिर अंसारी, मुददसर मुकादम आदि उपस्थित होते
