नरडवे रस्त्यावर झाड पडल्याने
वाहतूक झाली विस्कळीत

⚡कणकवली ता.२४-: वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शुक्रवारी दुपारच्या सुमारास झालेल्या कणकवली – नरडवे रस्त्यावर अकेशियाचे झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. नगरपंचायत कर्मचाऱ्यां मार्फत हे झाड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र तात्पुरत्या स्वरूपात एका बाजूने वाहतूक करण्यात आली. झाड पडल्यामुळे कणकवलीहून नरडवे च्या दिशेने जाणारा एक मार्ग बंद झाला होता.

याची माहिती मिळताच नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, प्रवीण गायकवाड, सतीश कांबळे, मनोज धुमाळे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर पडलेले झाड हटवीण्यासाठी मदत कार्य सुरू केले.

You cannot copy content of this page