वेंगुर्ले व्यापाऱ्यांसाठी काटे फेर पडताळणी मोहीम २५ पासून सुरू

उपस्थित राहण्याचे विजय नेमलेकर यांचे आवाहन

मालवण दि प्रतिनिधी
निरीक्षक वैद्य मापन शास्त्र विभाग, सावंतवाडीतर्फे वेंगुर्ले तालुक्यातील व्यापारी बांधवांनी काटे, वजन मापे, इलेक्ट्रिक काटे यांचे फेरपडताळणी व मुद्रांकन (शिक्के) करण्यासाठी वेंगुर्ले पिराचा दर्गा येथे २५ जूनपासून पडताळणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सर्व मच्छीमार, रॉकेल, काजू किराणा, रेशन शॉप, भाजी व चिकन, मटण विक्रेत्यांनी काटे, वजने मापे सकाळी ९ वाजता घेऊन यावीत. तसेच आपले आधारकार्ड, मागील पावती व प्रमाणपत्र गरजेचे आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन विजय नेमळेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page