⚡देवगड ता.२३-: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मध्ये राजकीय भूकंप होऊन राज्यातील राजकारणात उलथापालथ सुरू झाली.यामुळे महाविकास आघाडी सरकार मधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून त्यांनी शिवसेनेच्या ३७ आमदारांसोबत अन्य अपक्ष आमदार समवेत वेगळा शिवसेना गट निर्माण केला .
राज्यात ठिकठिकाणी संघर्ष घोषणाबाजी,बॅनर बाजी सुरू झाली .त्याचे पडसाद देवगड जामसंडे शहरात उमटले आहेत जामसंडेमध्ये ‘उद्धव साहेब, आम्ही सदैव तुमच्या सोबत’ अशा आशयाची बॅनर बाजी देवगड जामसंडे मधील शिवसैनिकांनी केली आहे.
राज्यसभा,विधानपरिषद निवडणूक निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे ‘नॉट रीचेबल’ होऊन शिवसेनेला मोठा धक्का दिला. यामुळे शिवसेनेच्या गोटात सन्नाटा पसरला.
या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून आमदारांची बैठक घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील बैठक घेत आहेत. . त्यामुळे शिवसैनिक एकवटले असून देवगड जामसंडे मधील शिवसैनिकांनी बॅनर बाजी करून आम्ही सदैव तुमच्या सोबत असल्याचे सांगितले आहे.
