देवगड
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत २५जून ते १ जुलै या कालावधीत तालुक्यातील प्रत्येक कृषी कार्य सहाय्यका मार्फत दररोज एका गावात शेतकरी मेळावे आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कृषी संजीवनी मोहिमेची सांगता १ जुलै रोजी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषी दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे .
या मोहिमेद्वारे कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करताना शेतकऱ्यांना बांधावर जाऊन नवीन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या सप्ताहात २५ जून रोजी तालुक्यातील पिकांचे तंत्रज्ञान प्रचार व पीक फेर पालट बाबत मार्गदर्शन, भात शेतामध्ये विविध भात लागवड तंत्रज्ञान बियाणे निवड बीजप्रक्रिया कार्यक्रमांचे आयोजन २६ जून रोजी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन २७ जून रोजी महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण अंतर्गत महिलांसाठी कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शक महिला शेतीशाळा २८ जून रोजी रासायनिक खत बचत दिन – जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर यांच्या नॅनो युरीया वापर प्रसिद्धी २९ जून रोजी प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर क्षेत्रीय भेटी व संवाद प्रगतशील शेतकरी संवाद रिसोर्स बँक मधील शेतकऱ्यांच्या सहभाग, ३० जून रोजी शेती पूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस साजरा शेतीपूरक व्यवसायाबद्दल प्रचार प्रसिद्धी १ जुलै रोजी कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता व कृषी दिन साजरा करण्यात येणार आहे. सदर मोहिमेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन देवगड तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांनी केले आहे.
