⚡देवगड ता.२३-: तालुक्यातील शिवसैनिक हा सच्चा शिवसैनिक असून स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेला असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती व शिवसैनिकाशी असलेली जवळीक आपुलकी यामुळे देवगड तालुक्यातील शिवसैनिक हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम पणे उभा आहे.व या पुढील काळात देखील या तालुक्यातील शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी ठाम पणे उभे राहतील असा आत्मविश्वास तालुका प्रमुख मिलिंद साटम यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
देवगड तालुक्यात शिवसेनेची अभेद्य फळी पूर्वीपासून असून देवगड तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.महाराष्ट्रातील राजकारणात राजकीय भूकंप होत असले तरी त्याचा धक्का देवगड तालुक्याला पोहचू शकत नाही.अशा घटनांमधून शिवसैनिक या पुढे देवगड तालुक्यात अधिक जोमाने काम करणार आहे.असेही त्यांनी सांगितले.
