प्रा. राजाराम परब :काळसे येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन.
⚡मालवण ता.२३-: विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून न जाता आणि अपयशाने खचून न जाता यशामध्ये आणि अपयशामध्ये जो संतुलित राहतो तो खरा विद्यार्थी. तुम्ही किती बुद्धिमान किती श्रीमंत आहात यापेक्षा तुमच्या कामात किती सातत्य आहे यावरून तुमचे यश ठरत असते. तसेच तुमची परिस्थिती कशी असली तरी चालेल यशस्वी होण्यासाठी सातत्य महत्वाचं आहे. ” असे प्रतिपादन परफेक्ट ॲकॅडमी कुडाळचे चेअरमन प्रा. राजाराम परब यांनी काळसे येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने नुकतेच श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे व स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कला , वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी संस्था अध्यक्ष हेमंत परब , उपाध्यक्ष योगेश राऊळ ,सचिव केशव सावंत , दाजी परब संचालक तथा निवृत्त उपजिल्हाधिकारी विनोद गोसावी, निवृत्त तहसीलदार शरद गोसावी , राजन प्रभु , गजानन प्रभु, सुवर्ण काळसेकर, अध्यापक विद्यालय आजगावचे प्राध्यापक रूपेश पाटील , मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर , हितेंद्र काळसेकर आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले
यावेळी प्रा परब यांनी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर परिस्थितीच्या छाताडावर पाय देउन उभ राहता आलं पाहिजे, परिस्थितीच रडगाणं न सांगता आलेल्या परिस्थितीवर मात करून विजय मिळवावा असे आवाहन केले
यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.
