वेंगुर्ले येथे उद्या अंमली पदार्थ विरोधी सप्ताह निमित्त “जनजागृती व प्रबोधनात्मक चर्चासत्र”

आम्ही वेंगुर्लेकर’ चे आयोजन

⚡वेंगुर्ले ता.२३-: वेंगुर्ले येथे उद्या शुक्रवार 24 जून रोजी ‘आम्ही वेंगुर्लेकर’ तर्फे अंमली पदार्थ विरोधी सप्ताह निमित्त “जनजागृती व प्रबोधनात्मक चर्चासत्र” सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे.


अंमली पदार्थ विरोधी सप्ताह शासनामार्फत दिनांक 19 जून ते ते 26 जून या कालावधीत
आयोजित केला असून 26 जून रोजी अंमली पदार्थ विरोधी दिन संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी, सेवन, विक्री व वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून आपली तरुणाई या नशेमध्ये गुंतत चालल्याचे निदर्शनास येत आहे. यासाठीच व्यसनाधीन झालेल्या तरुण पिढीला वेळीच योग्य दिशा देण्यासाठी विशेष उपक्रम पोलीस प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने दिनांक 26 जून पासून सुरू करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ले येथे उद्या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मान्यवर व तज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार असून वेंगुर्लावासीयांनी या उपक्रमाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page