भाजपचे आयोजन: भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे संजू परब, अजय गोंदावळे यांचे आवाहन
⚡सावंतवाडी ता.२३-: महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे यासाठी उद्या शुक्रवार दिनांक २४ जून रोजी सावंतवाडी भाजप कडून शहरातील विठ्ठल मंदिरात पुरोहितांच्या उपस्थितीत आणि मंत्रोच्चाराच्या गजरात यज्ञ करण्याचे आयोजन केले असून, या कार्यक्रमासाठी भाजपच्या सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते यांनी सकाळी ९ वाजता विठ्ठल मंदिर येथे उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष संजू परब आणि भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले आहे.
