⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ला हायस्कूल माजी विद्यार्थी संघातर्फे केलेल्या आर्थिक सहाय्यातून वेंगुर्ला हायस्कूलच्या पाच वर्ग खोल्यांची पुर्नबांधणी करण्यात आली आहे. त्याचा उद्घाटन सोहळा २८ जून रोजी आयोजित केला आहे.
वेंगुर्ला हायस्कूलच्या सर्वांगिण विकासासाठी वेंगुर्ला हायस्कूल माजी विद्यार्थी संघ कार्यरत आहे. या संघातर्फे हायस्कूलच्या पाच वर्ग खोल्यांच्या पूर्नबांधणीसाठी टप्प्या टप्प्याने आर्थिक सहाय्य केले होते. यातून वर्गखोल्यांच्या पूर्नबांधणीचे काम पूर्णत्वास आले आहे. या पूर्नबांधणी केलेल्या नविन वर्गखोल्यांचा उद्घाटन समारंभ २८ जून रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ला येथील साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे यांच्या हस्ते होणार आहे. तरी या कार्यक्रमाला हायस्कूलच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी, हितचितकांनी आणि शिक्षणप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
