हेमंत मराठे यांनी आ नितेश राणे यांचा वाढदिवस केला अनोखा साजरा

माऊली मतिमंद विद्यालयातील मुलांना केले धान्य व खाऊ वाटप

⚡सावंतवाडी ता.२३-: आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली मतिमंद विद्यालयातील मुलांनाहेमंत मराठे यांच्याकडून खाऊ व धान्य वाटप करण्यात आले.

आमदार नितेश राणे यांचा वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतचे उपसरपंच हेमंत मराठे यांच्या माध्यमातून दांडेली येथील माऊली मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना धान्य वाटप तसेच खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी त्यांच्यासोबत सरपंच मिलन पार्सेकर, ग्रा प सदस्य अमोल नाईक, ग्रा म सदस्य मधुकर जाधव उपस्थित होते.मुलांना धान्य व खाऊ वाटप केल्याबद्दल माऊली मतिमंद विद्यालयाच्या प्रशासनाने हेमंत मराठे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.तसेच आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हेमंत मराठे यांनी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली.

You cannot copy content of this page