मडुरा नाबर प्रशालेत योगदिन उत्साहात

⚡बांदा ता.२३-: मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेच्या शिक्षिका प्रतिक्षा शिरोडकर यांनी विद्यार्थ्यांना योगदिन व विद्यार्थ्यांच्या जीवनात योगाभ्यासाचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नियमितपणे योगासने करावीत असे आवाहन केले.

सहशिक्षिका प्राची परब यांनी विद्यार्थ्यांकडून योगासने करुन घेतली. योगासने करताना मनाची एकाग्रता व नियमितपणा याची आवश्यकता त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिली. नर्सरी ते चौथी इयत्तेमधील सर्व विद्यार्थी योगभ्यासाच्या वर्गात सहभागी झाले होते. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका निती साळगावकर, सहशिक्षिका प्रतिक्षा शिरोडकर, वेलांकनी रॉड्रिग्ज, प्राची परब, पालक दिनेश नाईक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page